कोरोनाबाधितांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या क्लिनिकल ट्रायलवर जागतिक आरोग्य संघटनेची बंदी
schedule26 May 20 person by visibility 360 categoryआरोग्य
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे संकट वाढत असताना त्यावर जगभरात औषधाचं संशोधन सुरु आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाबाधित रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या देत आहे. मात्र जगातील अनेक देशांनी या औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने देखील याचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी मलेरियाचं औषध वापरु नये, असं डब्लूएचओने सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, खबरदारी म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची क्लिनिकल चाचणी तात्पुरती बंद केली आहे. हा निर्णय एका रिपोर्टच्या आधारे घेतला या रिपोर्टमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या रिपोर्टच्या आधारावर या गोळ्यांचा वापर बंद केल्याचं डब्ल्यूएचओने सांगितंल आहे.