कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून १४४ कलम लागू
schedule08 Nov 19 person by visibility 6650 categoryराजकारण
कोल्हापूर:प्रतिनिधी:द फायर: सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या काही दिवसात महत्वपूर्ण खटल्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्मान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आज पासून १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दि. १८ नोव्हेंबर पर्यंत हे कलम लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.