खळबळजनक; सांगावचे बापू कोरोना पॉझिटिव्ह, कागलचे साहेब होम क्वारंटाईन
schedule15 Jul 20 person by visibility 10836 categoryराजकारण
कागल: द फायर: विशेष प्रतिनिधी: जिल्ह्यातील विविध संस्थावर काम करणारे कसबासांगावचे बापू कोरोनाव्हायरस बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांचा नेता असलेला कागलमधील बडा नेता क्वारंटाईन झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील एक मध्यवर्ती बँक, जिल्हा स्तरावरील संघ तसेच जिल्हा परिषदेतील अनेक नेते यांनी स्वतः होमक्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद, बँक तसेच जिल्हा संघ अशा अनेक संस्था कागल तालुक्यातील कसबा सांगावच्या बापूंचा वावर असतो. गेले काही दिवस ते आजारी आहेत. त्यांच्या कोरोनाव्हायरसचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र त्यांना अन्य आजारावर उपचारासाठी पुण्यातील एका नामवंत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांचा काल आलेला अहवाल कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील सुमारे 70 हून अधिक व्यक्तींना तपासणीसाठी कागल येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले व होम क्वारंटाईन राहण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. बापूंचा वावर अनेक ठिकाणी व अनेक एक जिल्हास्तरावरील संस्थात आहे. त्यामुळे त्यांचा नेता असलेल्या कागल मधील एका बड्या नेत्यांसह अन्य अनेक संस्थातील त्यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. कागल मधील या नेत्याने स्वतः चाचणी करून घेतली आहे. त्यात त्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असल्याचे समजते. मात्र त्यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या कसबासांगावच्या बापूंचा अहवाल कोरोना पॉझिटिव आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.