Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

शिरोळच्या दत्त कारखान्यामार्फत ऑनलाईन मार्गदर्शन उपक्रमांचे आयोजन

schedule24 Jul 20 person by visibility 232 categoryउद्योग

जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी:

सध्याच्या लॉक डाउन आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत शेतकरी, युवक-युवती तसेच विध्यार्थ्यांना नवी उभारी देण्याच्यादृष्टीने शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि  डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौंडेशनच्या वतीने झूम मिटींग आगि फेसबूक लाईव्ह द्वारे ऑनलाईन मार्गदर्शन व समुपदेशनाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या विविध उपक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपंडीत गणपतरावदादा पाटील यांनी केले आहे.

त्यांनी सांगितले की २०जूनपासून या उपक्रमांना सुरुवात झाली आहे. शेतक-यांसाठी प्रत्येक शनिवारी दुपारी ४:०० ते ६:०० या वेळेत झूम मिटींग आणि फेसबुक लाईव्हवरून आतापर्यंत व्याख्याते वसंतराव हंकारे यांचे सुपर केन नर्सरी, कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडूरंग मोहिते यांचे ऊस पिकावरील कीड व त्याचे नियंत्रण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे निवृत संशोधक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांचे उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरुण मराठे यांचे जमिनीची सुपिकता आणि जमिनीतील सेंद्रीय कर्ब या विषयावर

मार्गदर्शन झाले आहे. उद्या२५ जुलै रोजी सेंद्रीय शेती-समज व गैरसमज या विषयावर कणेरी मठाचे प.पु.काडसिध्देश्वर महास्वामीजींचे तर १ ऑगस्ट रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. रमेश हापसे यांचे ऊस वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्व या विषयावरील मार्गदर्शनाचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, यासाठी दि. २१ जूनपासून ३० ऑगस्टपर्यंत इयत्ता १ ली ते १० वी साठी शालेय विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून गणपतराव पाटील पुढे म्हणाले, लॉकडाऊनमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या युवक-युवतींना उभारी देण्याच्या उद्देशाने गुरुवार दि. २३ जूनपासून दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत व्याख्याते वसंतराव हकारे यांचे "मन करा रे प्रसन्न" या विषयावर समुपदेशनाचे झूम मिटींगद्वारे ऑनलाईन वर्गही सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक गुरुवारी ५ आठवडे हे वर्ग चालणार आहेत.तरी विद्याथी, शेतकरी, युवक- युवतींनी  या वरील विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहनही गणपतराव पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes