संततधार कायम ,पंचगंगा यंदा प्रथमच पात्राबाहेर ,जिल्ह्यातील 73 बंधारे पाण्याखाली
schedule05 Aug 20 person by visibility 474 categoryइतर
कोल्हापूरः द फायरः प्रतिनिधीः प्रदीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही दमदार हजेरी लावली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात विशेषतः पश्चिम भागातील डोंगराळ आणि नद्यांच्या व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत काल रात्री तब्बल दहा फूट वाढ झाली. सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते आहे. पंचगंगा यंदाच्या पावसाळ्यात प्रथमत पात्राबाहेर पडली आहे. जिल्ह्यातील जवळजवळ 73 बंधारे आज सकाळपर्यंत पाण्याखाली गेले आहेत.अनेक भागात ओढे-नाले दुथडी भरून वहात असल्याने अनेक गावांचा संपर्क खंडित होईल, अशी परिस्थिती आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने होणारी वाढ गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी जागी करणारी आहे.