शंभराव्या वाढदिनी श्रीमती परदेशी यांनी दिली कोविड निर्मुलनासाठी अडीच लाखांची आर्थिक मदत
schedule19 May 20 person by visibility 527 categoryमहिला
कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी: आपल्या वयाचे शतक पुर्ण करणाऱ्या श्रीमती सरस्वतीबाई प्रभाकर परदेशी यांनी आपला वाढदिवस अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला.काल त्यांनी कोरोना आपतकालीन व्यवस्थापनाकरीता आपल्याकडील साठवलेल्या रक्कमेचा अडीच लाख रु.चा चेक जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचेकडे इएसआयसी हॅास्पीटल येथे दिला.
संपुर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेकारणाने माजी स्थायी समिती सभापती सुनिल मोदी यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती परदेशी यांनी आपली सामाजीक बांधिलकी ओळखून आपण साठवलेल्या रक्कमेतील अडीच लाख रु.ची रक्कम कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे आपल्या वाढदिवसादिवशी दिली. यामधून आपती केंद्राकरीता कोविड निर्मुलनाकरीता आवश्यक असणारे अत्याधुनीक पोलर बेड व इतर आवश्यक वैद्यकीय साहित्य घेण्यात येणार असल्याचे इएसआयसी हॅास्पीटल समन्वयक विज्ञान मुंडे यांनी सांगितले.
यावेळी मोदी कुटूंबीय हे आपत्ती व्यवस्थापनेमध्ये नेहमीच पुढे असते. माजी नगरसेवक सुनिल मोदी यांना त्यांच्या मातोश्रींकडून समाजकारणाचे धडे मिळालेले आहेत. श्रीमती सरस्वतीबाई परदेशी यांनी या वयात सामाजीक बांधिलकी ओळखून केलेली मदत खरोखर महत्वाची असून त्यांचे हे काम समाजासमोर दिपस्तंभासारखेच असून त्यांच्या या कामाची स्फुर्ती घेवून इतर अनेक दानशुर व दातृत्वान लोकांनी पुढे येवून माणूसकीची भिंत उभी करावी असे आवाहन खासदार मंडलिक यांनी केले.
यावेळी याकार्यक्रमास देवस्थान व्यवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आम.चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, हॅास्पीटल समन्वयक विज्ञान मुंडे, नितीन पाटील, नावेद मुल्ला, ॲड.सुरेश कुराडे, निवास पाटील आदी उपस्थित होते.