खुशखबरःसार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना 15 टक्के पगारवाढ, प्रोत्साहनपर भत्ता
schedule23 Jul 20 person by visibility 509 categoryउद्योग
मुंबईःद फायरःप्रतिनिधीःएकीकडे कोरोनाव्हायरसच्या महामारी मुळे उद्योग,व्यवसाय ठप्प झाले आहेत.त्यामुळे कामगार कपात तसेच वेतन कपात सुरू आहे.असे असताना सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्यांसाठी खुशखबर आहे. त्यांच्या पगारात पंधरा टक्के पगार वाढ होणार आहे.तसेच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे.1 नोव्हेंबर 2017 पासून ही पगारवाढ लागू होणार आहे.बँक कर्मचाऱ्यांची संघटना आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वरील निर्णय घेण्यात आला. यामुळे बँकांना 7 हजार 988 कोटी रुपये अतिरिक्त खर्च कर्मचारी पगार पोटी करावे लागणार आहेत.कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ संदर्भात गेली दोन वर्षे चर्चा सुरू होती.त्यावर आता तोडगा निघाला आहे.