Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

मान्सूनने ठोठावले दोन दिवसआधीच केरळचे दरवाजे : स्कायमेट वेदर

schedule30 May 20 person by visibility 337 categoryपर्यावरण

मुंबई: मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज होता. मात्र आजच मान्सून केरळच्या समुद्रकिनारी दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने केला आहे. स्कायमेट वेदर ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे. मागील वर्षी मान्सून आठ दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळमध्ये पोहोचला होता.स्कायमेट वेदरने यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या आधी म्हणजेच 30 मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. पाऊस, ओएलआर व्हॅल्यू, हवेचा वेग इत्यादी अनुकूल आहेत.

दरम्यान याआधी भारतीय हवामान विभागाने मान्सून 1 जून रोजी केरळच्या समुद्रकिनारी दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु आयएमडीने गुरुवारी (28 मे) या अंदाजात बदल करत, सध्याची परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी अनुकून बनली आहे. परंतु मान्सून 5 जून रोजी केरळमध्ये पोहोचेल असे सांगितले होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes