राज्यात 24 तासात 8968 नवे रुग्ण, संख्या गेली साडेचार लाखावर
schedule04 Aug 20 person by visibility 527 categoryइतर
मुंबईःद फायरःप्रतिंनिधी: महाराष्ट्रातील कोरोना साथीच्या रुग्णांच्या संख्येतील वाढ कायमच आहे.गेल्या 24 तासात 8968 नवे रुग्ण आढळले असून 266 जणांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या चार लाख पन्नास हजार 196 झाली आहे तर या साथीने 15 हजार 842 बळी घेतले आहेत.सध्या एक लाख 47 हजार हून अधिक व्यक्तीवर राज्यभरात उपचार सुरु आहेत.त्यात राजधानी मुंबईतील रुग्णसंख्या एक लाख 17 हजार 406 एवढी आहे .मुंबईत या साथीने आतापर्यंत 64 93 रुग्णांचा बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईसह अनेक गावात सक्रिय रुग्णांची संख्या वाढीची गती मंदावते आहे. सध्या राज्यात नऊ लाख 77 हजार पेक्षा अधिक रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.