पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपातःशिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
schedule25 Jul 20 person by visibility 259 categoryशिक्षण
कोल्हापूरःद फायरःप्रतिनिधीः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होईल हे सांगता येत नाही.या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावी इयत्तांच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे .या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
आपल्या ट्विटमध्ये श्रीमती गायकवाड यांनी म्हटले आहे की कोविड 19 पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020- 2021 साठी इयत्ता आता पहिली ते इयत्ता बारावीसाठी सुमारे 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. कोरोनाव्हायरसमुळे शाळा अजून बंद असल्या तरी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आहेत त्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल याबाबत विद्यार्थी तसेच शिक्षक यांना प्रश्न पडलेला पहावयास मिळतो .त्यामुळे अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकांना शक्य होणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय विद्यार्थी व शिक्षक वर्गाला मोठा दिलासा देणारा आहे.