जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला,24 तासात 569 नवे रुग्ण,एकट्या पुष्पनगरमध्ये 41 पॉझिटिव्ह, मृतांची संख्या झाली दोनशेहून अधिक
schedule04 Aug 20 person by visibility 604 categoryइतर
कोल्हापूरः द फायरः प्रतिनिधीः ऑगस्ट महिन्यातही जिल्ह्यात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 569 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील या साथीच्या रुग्णांची संख्या 7579 वर गेली आहे.नव्या पॉझिटिव रुग्णात भुदरगड तालुक्यातील एकट्या पुष्पनगर या गावातील 41 नागरिकांचा समावेश असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे .आतापर्यंत या रोगाचे बळी ठरलेल्या रुग्णांची संख्या बघता बघता दोनशेहून अधिक झाली आहे .काल मध्यरात्रीपासून आतापर्यंत 206 व्यक्तींचा या आजाराने बळी घेतला आहे .सध्या जिल्ह्यात 4103 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 3270 रुग्ण कोरोणा मुक्त झाले असल्याने त्यांना डिस्चार्ज दिला गेला आहे .एकीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय असली तरी रुग्ण संख्येचा वाढता दर तसेच मृतांची संख्या चिंताजनक आहे .वाढत्या रुग्ण संख्येसाठी उपचारासाठी व्यवस्था करताना आरोग्य यंत्रणा निकराचा प्रयत्न करत आहे.