भुदरगड तालुक्यातील चार महिन्याच्या बाळाची आईसह, 85 वर्षांच्या आजीची कोरोनावर मात
schedule01 Aug 20 person by visibility 422 categoryमहिला
कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी: भुदरगड तालुक्यातील पाचवडे येथील 85 वर्षाच्या आजीला आणि शिंदेवाडीतील 4 महिन्याच्या बाळासह आईला आज शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.पाचवडे येथील मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांची 85 वर्षाची आई देखील 19 जुलै रोजी रात्री 10 वाजता ट्रेनिंग सेंटर येथे उपचारासाठी दाखल झाल्या. डॉ. भगवान डवरी, डॉ.मिलिंद कदम, डॉ. अमोल गुरव, डॉ. महेश गोनुगडे यांनी त्यांच्यावर उपचार केले. दोघांचाही स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या दोघांना काल डिस्चार्ज देण्यात आला. जाताना या आजींनी सर्व पथकाला आशीर्वाद देऊ केला.
4 महिन्याचे बाळ आणि आईचीही मात
भुदरगड तालुक्यातील शिंदेवाडी येथील 4 महिन्याचे बाळ आणि त्याची आई 21 जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ट्रेनिंग सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाळाच्या आईला औषधोपचाराबरोबरोच मानसिक पातळीवर सकारात्मकता निर्माण करणे आवश्यक होते. येथील पथकाने उत्तम पध्दतीने ते केले. बाळालाही योग्य औषधोपचार करण्यात आला. या दोघानाही डिस्चार्ज देण्यात आला.