चिंताजनकःजिल्ह्यात दिवसभरात तब्बल 702 नवे कोरोना पॉझिटिव्ह ,12 जणांचा मृत्यू
schedule05 Aug 20 person by visibility 719 categoryइतर
कोल्हापूरः द फायरः प्रतिनिधीः कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त नव्या पॉझिटिव रुग्णांचा विक्रम आज बुधवारी नोंदला गेला.तब्बल 702 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे.ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे .मृतांची संख्या सव्वा दोनशे पेक्षा अधिक झाली आहे.आतापर्यंत या महामारीने जिल्ह्यात 229 रुग्णांचा बळी घेतला आहे.
आज 162 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 3611 झाली आहे.एकीकडे रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आहे.दुसरीकडे मृतांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे सावट पसरले आहे .सध्या ॲक्टिव रुग्णांची संख्या 4576 वर पोहोचली आहे.