भाजपचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचे निधन
schedule01 Aug 20 person by visibility 385 categoryराजकारण
कोल्हापूरःद फायरःप्रतिनिधीः भाजपचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचे आज सायंकाळी निधन झाले.2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते संभाजीनगर प्रभागातून विजयी झाले होते. महाविद्यालयीन जीवनात ते राष्ट्रीय पातळीवरील हॉकी खेळाडू म्हणून गाजले होते. आज सायंकाळी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे सीपीआरमध्ये नेण्यात आले ,पण तेथे काही वेळातच त्यांचे निधन झाले. त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने निधनानंतर त्यांचा स्वाब घेण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर संतोष गायकवाड यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.