इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेला सरकारचा हिरवा कंदील !
schedule01 Jan 20 person by visibility 553 categoryनवनिर्मितीतंत्रज्ञान
बेंगळुरू : इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. या मोहिमेला सरकारने मंजुरी दिल्याची माहिती इस्रोप्रमुख के सिवन यांनी दिली. चांद्रयान 2 मध्ये चांगले काम सुरू आहे. जरी अपेक्षित यश मिळाले नसले तरी ऑर्बिटर काम करत आहे. पुढच्या 7 वर्षांपर्यंत आपल्याला माहिती पाठवत राहिल असेही त्यांनी सांगितले.
चांद्रयान मोहिमेसाठी तयारी सुरू करण्यात आली असल्याचे सांगून के सिवन म्हणाले की, दुसऱ्या स्पेस पोर्टसाठी जमीन संपादीत करण्यात आली असून थूटुकुडी इथं उभारणी करण्यात येईल. चंद्रावर मानवरहीत यान उतरविण्याची भारताची संधी काही महिन्यांपूर्वी थोडक्यात हुकली होती. चांद्रयान 2चा चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरवर असतानाच संपर्क तुटला होता. त्यामुळे इस्रोची ही महत्त्वाकांक्षी मोहिम पूर्ण यशस्वी होऊ शकली नव्हती. मात्र इस्रोने आशा सोडलेली नाही.इस्रो चंद्रावर सॉफ्ट लँडींगचा पुन्हा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी दिली.