निसर्ग चक्रीवादळ १०० ते १२० किलोमीटर वेगाने धडकणार
schedule03 Jun 20 person by visibility 341 categoryपर्यावरण
मुंबई: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्ट्यामुळे निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
राज्याच्या किनारपट्टीवर आज निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. आज अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरएफसह नौदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून ८५- ९५ ताशी वेगानं वारे वाहत आहे. साधारण हा वेग ११० किमीपर्यत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून १९० किलोमीटर अंतरावर असणारं चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.