महालक्ष्मी चेंबर्स समोरील झाड कोसळून चार मोटारींचे अडीच लाखांचे नुकसान
schedule04 Aug 20 person by visibility 290 categoryइतर
कोल्हापूरःद फायरःप्रतिनिधीः सीबीएस परिसरातील महालक्ष्मी चेंबर्सच्या फुटपाथवरील एक उंच झाड आज दुपारी अचानक कोसळले. दुपारी चार वाजता झालेल्या या प्रकारात झाड चार मोटारीवर कोसळले .त्यात या मोटारींचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या निलेश नाटकुळे व प्रमोद सुतार तसेच पार्किंगमध्ये लावलेल्या सुहास राजेभोसले व अशोक दुधानी यांच्या मोटारींचे नुकसान झाले.मात्र सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. झाड उंच असल्याने मुख्य रस्त्यावरच आडवे पडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.मात्र अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.त्यातील कर्मचाऱ्यांनी झाड तोडून व हटवून वाहतूक सुरळीत करून दिली.