2018-2019 चे आयकर रिटर्न भरण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
schedule30 Jul 20 person by visibility 473 categoryउद्योग
नवी दिल्ली: कोरोनाव्हायरस महामारी च्या साथीमुळे आयकर विभागाने 2018-2019 (असेसमेंट इयर २०१९-२०) सालचे आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता 30 सप्टेंबरपर्यंत या सालचा आयकर रिटर्न भरता येईल. आधी हा रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत होती. आता देशभरातील कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे आयकर विभागाने मुदतवाढ दिली आहे. तिसऱ्यांदा अशी मुदतवाढ देण्यात आली आहे.