सोने,चांदीला नवी झळाळीः दर नऊ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर
schedule22 Jul 20 person by visibility 291 categoryउद्योग
मुंबईः द फायरःप्रतिनिधीः सोने-चांदी या धातूंना बाजारपेठेत नवी झळाळी प्राप्त झाली आहे. गेल्या दोन दिवसात सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली असून दर नऊ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.आज कमोडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत घसघशीत एक टक्का वाढ झाली आणि सोन्याचा भाव 50,010 रुपयावर गेला .चांदीच्या भावात चार टक्के वाढवून प्रति किलोचा भाव 59,635 रुपये इतके झाला.
मुंबईत आज 24 कॅरेटचा भाव दहा ग्रॅमला 49 हजार 910 रुपये झाला तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार 110 रुपये झाला. चांदीचा भाव किलोला साठ हजार चारशे रुपये इतका झाला. कोरोनाव्हायरस महामारीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी केंद्रीय बँका नव्याने पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे .त्यामुळे कमोडिटी बाजारात तेजी निर्माण झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.