धरण क्षेत्रात चांगला पाऊस; उजनी धरण 24 तासात प्लस मध्ये येण्याची संकेत
schedule16 Jul 20 person by visibility 407 categoryपर्यावरण
सोलापूर: द फायर: प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यातील शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा स्त्रोत असलेले उजनी धरण येत्या 24 तासात मायनसची पातळी ओलांडून प्लसमध्ये अशी परिस्थिती आहे. यंदा जूनच्या अगदी सुरुवातीपासून पुणे जिल्ह्यासह उजनी धरणाच्या क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. यंदा आतापर्यंत 293 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी 16 जुलै अखेर केवळ 71 मिलिमीटर पाऊस झाला होता. तुलनेने यंदा खूप चांगला पाऊस झाल्याने उजनी धरणाची पाणी पातळी मायनसमध्ये जाऊन हे आता प्लस मध्ये येऊ पाहत आहे. पावसाळ्याचे अध्याप 75 पेक्षा अधिक दिवस बाकी आहे. पुणे जिल्ह्यातील धरणामध्ये सध्या सरासरी 40 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यातून विसर्ग वाढविण्यात आल्यास येत्या महिन्याभरात उजनी धरण 100% भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. एकूणच यंदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाऊस समाधानकारक आहे.