Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

पीएसएलव्हीचे यशस्वी अर्धशतक; इस्त्रोने प्रक्षेपित केले 'रिसॅट २ बीआर १'

schedule11 Dec 19 person by visibility 336 categoryतंत्रज्ञान

श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) धुव्रीय उपग्रह प्रक्षेपकांचे (पीएसएलव्ही सी ४८) अर्धशतक साजरे झाले. बुधवारच्या प्रक्षेपणामधून रडारचा समावेश असणाऱ्या 'रिसॅट २ बीआर १' या भारतीय उपग्रहासह इस्त्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण नऊ उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात आले. दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले.

पीएसएलव्ही हा भारताचा सर्वात भरवशाचा प्रक्षेपक मानला जातो. पृथ्वीभोवतीच्या ध्रुवीय कक्षेत १७५० किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची पीएसएलव्हीची क्षमता आहे. ३२० टनांच्या या प्रक्षेपकाची आतापर्यंत ४९ उड्डाणे झाली आहेत. चांद्रयान १ आणि मंगळयान या दोन अवकाश मोहिमाही पीएसएलव्हीनेच यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्या आहेत. तुलनेने कमी खर्च आणि प्रक्षेणातील अचूकता लक्षात घेऊन जगभरातील अनेक विकसित देश आपले हलके उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी पीएसएलव्हीला पसंती देतात.

पीएसएलव्हीच्या पन्नासाव्या उड्डाणातून ६२८ किलो वजनाच्या 'रिसॅट २ बीआर १' या उपग्रहाचे ५७६ किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपण करण्यात आले. 'रिसॅट २ बीआर १' या उपग्रहावर पृथ्वी निरीक्षण करण्यासाटी एक्स ब्रँड रडार बसवण्यात आले आहे. कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. त्याचसोबत इस्त्राईल, इटली, जपान यांच्या प्रत्येकी एक, तर अमेरिकेच्यासहा उपग्रहांनाही धुव्रीय कक्षेत पाठविण्यात येईल. या उपग्रहांचे व्यावसायिक तत्त्वावर करण्यात येईल.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes