आयटीआय प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर
schedule30 Jul 20 person by visibility 413 categoryशिक्षण
मुंबईः द फायरः प्रतिनिधीः आयटीआय प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली.
राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.
ऑनलाईन प्रक्रिया
यंदा प्रवेश अर्ज भरण्यापासून ते हरकती नोंदविण्यापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये,म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.