जयसिंगपूरात आजी-माजी नगराध्यक्षासह तीन जण पॉझिटिव्ह
schedule04 Aug 20 person by visibility 425 categoryइतर
जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी: येथे आज तीन महिलांचा कोरोना स्वबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये विध्यमान नगराध्यक्षा नीता माने आणि 12व्या गल्लीत राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा यांचा समावेश आहे अशी माहिती जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.पांडुरंग खटावकर यांनी दिली.खुद्द नगराध्यक्षा कोरोनाबाधित झाल्याने जयसिंगपूरमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
याबाबत डॉ.खटावकर यांनी सांगितले की नगराध्यक्षा माने यांना चार दिवसांपासून ताप येत होता त्यामुळे त्यांचा स्वब घेण्यात आला आणि आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी घरातच उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील सात सदस्य आणि एका नगरपालिका अधिकाऱ्याचा स्वब घेऊन त्यांना विलगिकरण करण्यात येत आहे. याशिवाय कोरोनाबाधित पतीच्या संपर्कात आल्याने 12व्या गल्लीत राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा कोरोनाबाधित झाल्या आहेत.त्यांना कुंजवन कोव्हीड सेन्टर मध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच शाहूनगरमधील एक 32 वर्षीय महिला कोरोनाबाधित आईच्या संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त झाल्या आहेत त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्यांनीही घरीच उपचार घेण्यास सुरुवात केली आहे असेही डॉ.खटावकर यांनी सांगितले.
जयसिंगपूर नगरपालिकेने नगराध्यक्षा ज्या 8 व्या गल्लीत राहतात तो भाग आणि त्यांच्या रुग्णालयाचा परिसर प्रतिबंधित करून या भागात औषध फवारणी केली आहे असे मुख्याधिकारी टीना गवळी यांनी सांगितले.तर लोकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले आहे.दरम्यान जयसिंगपूरमधील आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 102 झाली असून सहा जणांचे मृत्यू झाले आहेत.