कोरोनावरील उपचार पद्धतीत इंटरफेरोन बीटा उपयुक्त
schedule21 Jul 20 person by visibility 240 categoryआरोग्य
लंडन: ब्रिटनमधील सायनरजेन या कंपनीने कोरोनावरील उपचार पद्धतीत इंटरफेरोन बीटा उपयुक्त ठरत असल्याचे म्हंटले आहे. ही उपचार पद्धती कोरोना वरील प्रायोगिक चाचण्यात यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाची परिस्थिती या उपचार पद्धतीमुळे गंभीर होण्यापासून रोखली जाते. या उपचार पद्धतीत प्रथिन वापर उपचार पद्धती वापरली जाते. त्यात इंटरफेरोन बीटा या प्रथिनांचा वापर केला जातो. हे औषध दिल्यास फुप्फुसांची प्रतिकार शक्ती वाढून कोरोना विरोधी रोग प्रतिकार होईल, असा दावा कंपनीने केला आहे. प्रायोगिक चाचण्यात हे औषध दिलेल्या रुग्णांची स्थिती सुधारली. श्वास घेण्यातील अडथळा कमी झाला तसेच रुग्णाचा रुग्णालयातील उपचाराचा कालावधी तिपटीने कमी झाला, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.