दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर ;राज्यात 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण कोल्हापूरचा 97.64 टक्के
schedule29 Jul 20 person by visibility 222 categoryशिक्षण
मुंबई: दहावीचा ऑनलाइन आज दुपारी निकाल जाहीर झाला. यंदाचा निकाल गेल्या 15 वर्षातला सर्वात उत्तम निकाल असल्याचे बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले. राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला असून कोकण विभाग अव्वल आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा 3 टक्के जास्त विद्यार्थिनींचा निकाल आहे. विद्यार्थी आणि पालकांना हा निकाल बोर्डाच्या maharesult.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.
या वर्षीचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे 15 लाख विद्यार्थ्यांमधून 242 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. राज्यातील 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्यात 60 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती बोर्डाने दिली.
यंदा एकूण 15 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात मुलींचा निकाल 96.91% लागला असून मुलांचा निकाल 93.99% लागला आहे. विभागवारीनुसार कोकण विभागाचा 98.77 टक्क्यांसह सर्वात जास्त लागला आहे. तर, त्यानंतर कोल्हापूरचा 97.64 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा निकाल लागला आहे. तर, पुण्याचा 97.34 आणि मुंबईचा 96.72 % लागला आहे.