महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
schedule11 Jun 20 person by visibility 568 categoryकरमणूक
मुंबई: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. परिणामी येत्या काही तासात गोवा, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ही शेतकर्यांच्या दृष्टीने दिलासादायक गोष्ट आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 11 ते 14 जून या चार दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. गोवा, कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जाते .
महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यापूर्वी मुंबईत काही ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. मुंबईतील दादर, मांटुंगा, कुलाबा, मालाड, कांदिवली या ठिकाणी पावसाने हजेरी लावली.