अभिमानास्पद :स्वदेशी एलीसा अँटीबॉडी टेस्ट किटची भारतात निर्मिती
schedule11 May 20 person by visibility 352 categoryनवनिर्मिती
नवी दिल्ली : भारताने स्वदेशी एलीसा अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती करून कोरोना विरोधातील लढाईत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या किटमुळे अगदी कमी वेळात कोरोनाची तपासणी करणं शक्य होणार आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांनी कोविड-19 च्या तपासणीसाठी पूर्णपणे स्वदेशी अशा एलीसा (Elisa) अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती केली आहे.
आरटीपीसीआरया कोविड टेस्टमुळे कोरोना व्हायरसची बाधा झालीय की नाही हे समजेल,पूर्णपणे स्वदेशी एलिसा कोविड कवच टेस्टमुळे किती मोठ्या लोकसंख्येला किंवा समूहाला लागण होऊ शकते, हे समजण्यास मदत होणार आहे. या किटची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबईतील 2 वेगवेगळ्या परिसरांत या किट्सचा वापर करून तपासण्या करण्यात आल्या. त्यातून याचे परिणाम योग्य असल्याचं दिसून आलं. अडिच तासांत या किट्सच्या माध्यमातून 90 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहे. ड्र्ग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या किट्सच्या कमर्शिअल प्रोडक्शनसाठी जायडस कॅडिलाला परवानगी दिली आहे. दरम्यान, देशात जे टेस्ट किट विकसित करण्यात आलं आहे, ते एक अँटीबॉडी टेस्ट किट आहे. प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, हे किट्स लवकरच देशभरात उपलब्ध होणार आहेत.
अँटीबॉडी टेस्ट आणि आरटीपीसीआर काय आहे?
जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही व्हायरसमुळे बाधित होते, त्यावेळी तिच्या शरीरात व्हायरशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. शरीरात असलेल्या अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी रॅपिड टेस्टची गरज असते. अँटीबॉडी टेस्टचा अहवाल अगदी कमी वेळात येतो. तर कोरोना तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RT PCR चा अहवाल येण्यासाठी जवळपास 24 तास लागतात.