Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

OnePlusचा सर्वात स्वस्त फोन आज होणार लॉन्च

schedule21 Jul 20 person by visibility 572 categoryतंत्रज्ञान

मुंबई: स्वस्त आणि खास फिचर्सने परिपूर्ण अशा वनप्लसचा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. OnePlus आज आपला नवा फोन 'Nord' लॉन्च करणार आहे. हा फोन कमी बजेटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनचे लॉन्चिंग गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या OnePlus Nord AR अॅपमार्फत करण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी हा फोन लॉन्च करण्यात येणार आहे.

OnePlus Nord मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट, 6 जीबी रॅन, 6.65 इंच स्क्रीन आणि 3 रियर कॅमेरा असणार आहेत. हँडसेटमध्ये स्क्रिनवर एक पंच-होल कटआउट असणार आहे. हा फोन ड्युअल फ्रंट कॅमेऱ्यासोबत लॉन्च करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त यामध्ये पॉवरफुल बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे. नव्या OnePlus Nord ची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत असू शकते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes