Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीची पहिल्या स्टेजमधील मानवी चाचणी यशस्वी

schedule20 Jul 20 person by visibility 346 categoryनवनिर्मिती

नवी दिल्ली : काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधात ऑक्सफर्ड विद्यापीठ लस विकसित करण्याचे काम करत आहे. पहिल्या स्टेजमध्ये ऑक्सफर्डने केलेल्या लसीच्या मानवी परीक्षणाचे निकाल सकारत्मक मिळाले असून लवकरच या संदर्भातील माहिती द लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. ही लस कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते. या चाचणीनंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असून त्याच्या निकालांकडे सर्व जगाचे लक्ष असणार आहे.

अधिकृत AZD1222 या नावाने ओळखली जाणारी ही लस जेनर इन्स्टिट्यूटने बनवली आहे. ही लस कोरोनाव्हायरस पासून बचावासाठी शरीरात अँटीबॉडीड आणि किलर टी- सेल्स बनवण्यात मदत करु शकते. ज्यामुळे कोरोनाव्हारस विरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीचे दुसर्‍या टप्प्यातील यश फार महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताच्या दृष्टीने या लस फार महत्त्वाची आहे. ऑक्सफर्डच्या या लस प्रकल्पात पुण्याची सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था सहभागी आहे. सिरमकडून या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे यशस्वी ठरलेल्या अन्य लसींच्या तुलनेत ही लस भारतीयांना लवकर मिळू शकते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes