‘निसर्ग’ने टाळले मुंबईला ; मुंबई परिसरासह सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू
schedule04 Jun 20 person by visibility 497 categoryपर्यावरण
मुंबई : ‘निसर्ग चक्रीवादाळाने काल मुंबई आणि परिसरावर कृपादृष्टी दाखवत तडाखा दिला नाही.मात्र आज गुरुवारी पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे.
मुंबई आणि उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांच्या काही भागात येत्या काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर नवी मुंबईसह ठाणे शहरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. काल पालघर जिल्ह्याला वादळाचा तडाखा बसला. चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर विजेचे खांब आणि होर्डिंग कोसळले.
पुढील तीन तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, कोकण आणि अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरु झाला. रत्नागिरीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. तर सिंधुदुर्गातही जोरदार पाऊस कोसळत आहे.