ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही धोक्यात
schedule27 May 20 person by visibility 128 categoryक्रिडा
दुबई: कोरोनामुळं सध्या जगभरातील सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहे. आता ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही धोक्यात आली आहे. कोव्हिड-19मुळं आयसीसीच्या वतीनं ही स्पर्धा आता तब्बल दोन वर्ष म्हणजेच 2022पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे. यासंदर्भात 28 मे रोजी आयसीसीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
ऑक्टोबर 2021मध्ये भारताला याआधीच टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद देण्यात आलं आहे. एका वर्षात एकाच स्वरूपाचे दोन विश्वचषक नियोजित करणं अनुचित आहे. सध्याची परिस्थिती पाहता सहा महिने आयसीसी कोणताही मोठी स्पर्धा आयोजित करण्याच्या विचारात नाही आहे. दरम्यान या निर्णयामुळं क्रिकेट प्रेमींना आणि होस्ट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सना मोठा फटका बसला आहे.