बीसीसीआयने मला योग्य वर्तणूक दिली नाहीःयुवराज सिंग
schedule27 Jul 20 person by visibility 146 categoryक्रिडा
नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्याला कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात योग्य वर्तणूक दिली नाही ,असा आरोप माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी केला आहे .तसेच हरभजन सिंग, सेहवाग व जहीर खान यांनाही योग्य पद्धतीने निरोप दिला नाही, अशी टीकाही त्याने केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 वर्ष लक्षणीय योगदान दिल्यानंतर युवराज सिंग याने गेल्यावर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेटला आम्ही दिलेल्या योगदानाचा योग्य सन्मान राखला गेला नाही ,असे सांगत युवराज सिंगने म्हटले आहे की माझ्याप्रमाणेच हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग व जहीर खान यांनाही कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यात योग्य वर्तन केले नाही. मला तसेच माझ्या तीन सहकाऱ्यांसाठी निरोपाचा सामना आयोजित केला गेला नाही अर्थात आपल्याशी बीसीसीआयने केलेले वर्तन अनपेक्षित नव्हते,असा टोलाही या अष्टपैलू खेळाडूने लगावला आहे.आतातरी क्रिकेट मंडळाने या खेळाडूंचा योग्य सन्मान करावा, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.