निगवे दु॥ येथे अनोख्या पध्दतीने साजरा झाला रक्षाबंधनचा सण...!
schedule04 Aug 20 person by visibility 260 categoryइतर
निगवे:द फायर:प्रतिंनिधी:
निगवे दु॥ ता.करवीर येथे कोरोना संसर्ग वाढत असल्याने गेली चार दिवस कडक लॉकडाऊन करणेत आले आहे. त्यामुळे रक्षाबंधन सणावरही त्याचा परिणाम दिसून आला.बहिणीला आपल्या भावाकडे जाता येईना व भावाला पण आपल्या बहिणीकडे येता येईना . अशा प्रसंगी गावातीलच प्राथमिक शिक्षक श्री. राजाराम बळवंत पाटील यांनी अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरा केला . गेली चार महिने अंगणवाडी सेविका , मदतनीस , आशा वर्कर ह्या स्वतःचा जीव धोक्यात घालून घरोघरी फिरून आरोग्य सर्व्हेक्षण करत आहेत . अशा गावातील एकूण आठरा कोवीड योद्धा यांना प्रत्येकी पाचशे रुपये रक्षाबंधन भेट देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपत हा सण साजरा केला . या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ही भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण साजरा करता आला याचे समाधान प्रत्येक कोवीड योध्दा यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते . या कार्यक्रमामुळे आम्हाला पुन्हा जोमाणे काम करण्याचे बळ व प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली .
सदर कार्यक्रमास प्राथ.आरोग्य केंद्राच्या मेडीकल ऑफिसर मा. डॉ. सूर्यवंशी मॅडम , आरोग्य सेविका मा.भिमटे मॅडम , मा.सर्जेराव पाटील, चेअरमन व्ही.बी.पाटील पाणीपुरवठा संस्था. मा. राजू कासार माजी जि.प. सदस्य.गावातील सर्व अंगणवाडी सेविका , मदतनीस व आशा वर्कर उपस्थित होत्या कोविड संसर्गामुळे संवेदनाहीन होत चाललेल्या या संवेदनशील शिक्षकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकांनी यातून प्रेरणा घेतली असून तेही आता पुढे सरसावले आहेत. राजाराम पाटील या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांने केलेले कार्य खरोखरच आदर्श आहे. गेल्या वर्षी पुरग्रस्तांना मदत करायलाही हा अवलिया पुढेच होता. क्रिएटिव्ह टीचर्स फोरमच्या माध्यमातूनही सतत मदतीसाठी, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या टेक्नोसेवी गुरुमित्राचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!