Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

विमानतळाच्या प्रलंबीत प्रश्नांकरीता दिल्ली येथील उच्च स्तरिय समिती लवकरच कोल्हापूरला भेट देणार : खासदार संजय मंडलिक

schedule31 Jul 20 person by visibility 461 categoryउद्योगराजकारण

दिल्ली:द फायर:प्रतिंनिधी:  कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा, कोल्हापूर-मुंबई साठी सकाळच्या सत्रातील विमान सेवेसह अहमदाबाद व जयपूर या मार्गावर नविन विमानसेवा सुरु व्हावी यासह विविध मागण्यांसदर्भात खासदार संजय मंडलिक यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद सिंह यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेवून सविस्तर निवेदन देवून चर्चा केली.  यावेळी झालेल्या चर्चेनुसार कोल्हापूर विमानतळाच्या प्रलंबीत मागण्या व नविन विमानसेवा सुरु करणेसंदर्भात लवकरच उच्च स्तरिय समिती कोल्हापूर विमानतळाला लवकरच भेट देत असल्याचे अरविंद सिंह यांनी खासदार मंडलिक यांना सांगितले.

 दरम्यान यासंदर्भात बोलताना खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर विमानतळाचा नाईट लँडींगचा प्रश्न बरेच दिवसापासून प्रलंबीत असून कोल्हापूर येथे नाईट लँडिंग सुविधा सुरू झालेस दररोजच्या उड्डाणांची संख्या वाढणार आहे. येथील विमानतळाचे टर्मिनल इमारत, रनवे सबस्टेशनचे काम तातडीने पुर्ण होवून प्रवाशांकरीता आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरविणे गरजेचे असल्याचे खास.मंडलिक यांनी निदर्शनास आणून दिले.  कोल्हापूरहून मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असून या प्रवाशांच्या सोयीकरीता सकाळच्या सत्रामध्ये विमान सेवा सुरु केलेस प्रवाशांना मुंबई येथे लवकर पोहचून कामाचा निपटारा करुन त्याच दिवशी परत येणे शक्य होणार आहे.  सकाळच्या सत्रातील विमानसेवेमुळे कोल्हापूर येथील व्यापार, उद्योगधंदे व पर्यटनामध्ये वाढ होवून कोल्हापूरसारख्या टॅलेंट समृद्ध क्षेत्रातील आयटी आणि आयटीच्या व्यवसायासाठी नवीन दरवाजे उघडणार आहेत. 

 सध्या कोल्हापूर विमानतळावरुन उत्तर भारतात जायचे झाल्यास विमानसेवा नसलेकारणाने व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. याकरीता अहमदाबाद व जयपूर या दोन शहरांसाठी तातडीने नविन विमानसेवा सुरु करावी अशी मागणी केली आहे. या दोन शहरांशी विमानसेवा सुरु झाल्यास दीर्घ व्यावसायिक संबंध व कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपीठापैकी एक महालक्ष्मीचे मंदीर असलेकारणाने या ठिकाणी उत्तर भारतातील मोठ्या संख्येने भाविक येवून पर्यटन व्यवसाय वाढेल.  कोल्हापूरला निसर्ग संपदा विपूल प्रमाणात असलेकारणाने पर्यटकांची कोल्हापूरला अधिक पसंती आहे. त्यामुळे कोल्हापूरहून या अहमदाबाद व जयपूर करीता विमानसेवा सुरु करणेत याव्यात अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद सिंह यांचेकडे केली आहे. यावेळी याबैठकीस विमानतळ प्राधिकरणाचे विभाग प्रमुख कुमार पाठक, तांत्रिक नियोजन विभागाचे मुख्य अभियंता श्री व्यवहारे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॅामर्सचे संचालक विज्ञान मुंडे हे उपस्थित होते. श्री अरविंद सिंग यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून यापूर्वी काम केल्याने  विषयाबद्दल त्यांनी आस्थापूर्वक लक्ष देण्याचे आश्वासन दिले...

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes