सरकारी कर्मचारी, शिक्षक आदींचे मार्चचे उर्वरित वेतन गणेशोत्सवापूर्वी मिळणार
schedule29 Jul 20 person by visibility 214 categoryशिक्षण
कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: कोरोना व्हायरसच्या साथीमुळे राज्य सरकारने मार्च महिन्याच्या वेतनात सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींच्या वेतनात कपात केली होती. वेगवेगळ्या श्रेणीनुसार ही कपात करण्यात आली होती. आता ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्याचे उर्वरित वेतन दिले जाणार आहे. सध्या या जुलै महिन्याच्या वेतनाचे काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्याचे उर्वरित वेतन आधार करण्याचे काम काम केले जाणार आहे. मात्र ही रक्कम गणेशोत्सवापूर्वी दिली जावी असे आदेश राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिले आहेत. शासनाचे उपसचिव इंद्रजीत गोरे यांनी त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.