टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा आता 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान
schedule30 Mar 20 person by visibility 203 categoryक्रिडा
टोक्यो : कोरोनाच्या भयामुळे जपानमध्ये 2020 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान होईल.याबाबतची घोषणा सोमवारी करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ( आयओसी), आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती ( आयपीसी), टोक्यो आयोजन समिती आणि टोक्यो सरकारची बैठक झाली. त्यात ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला तर पॅरालिम्पिक 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणार आहे. आरोग्य विभागाने आम्हाला या तारखा दिल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे यंदाची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.असे आयओसी अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सांगितले.