Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

बच्चन पितापुत्र कोरोनामुक्त लवकरच मिळणार डिस्चार्ज

schedule23 Jul 20 person by visibility 456 categoryकरमणूक

मुंबई: द फायर: प्रतिंनिधी: महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी शुभवर्तमान आहे. अमिताभ बच्चन व त्यांचे पुत्र अभिषेक हे दोघेही पिता-पुत्र कोरोना मुक्त झाले आहेत. बच्चन कुटुंबातील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना केवळ कोरोना ची लागण झालेली नाही. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पिता-पुत्रांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी अभिषेक यांची पत्नी ऐश्वर्या व व कन्या आराध्या यांचाही ही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आता बिग बी अमिताभ व त्यांचे पुत्र अभिषेक यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना येत्या काही दिवसातच डिस्चार्ज दिला जाईल अशी अपेक्षा आहे. ऐश्वर्या व आराध्या  यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी मात्र कुटुंबियाकडून माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ज्येष्ठ अभिनेते अमिताभ यांनी भावविवश पोस्ट लिहित चाहत्यांचे आभार मानले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes