बॉलिवूडला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट अमिताभ, अभिषेक बच्चन पॉझिटिव्ह; जया बच्चन, ऐश्वर्या निगेटिव्ह, रेखाचा बंगला सील
schedule12 Jul 20 person by visibility 515 categoryकरमणूक
मुंबई :द फायर: विशेष प्रतिनिधी: जगभर दोनशेहून अधिक देशात फैलावलेल्या कोरोनाव्हायरस महामारी मायानगरी बॉलीवूडलाही आपल्या कवेत घेऊ पाहत आहे. बॉलिवूड भोवतीचा कोरोनाचा विळखा दिवसेदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. अनेक दिग्गज कलाकार कोरोनाव्हायरस बाधित आढळू लागले आहेत.
त्यात आता महानायक अमिताभ बच्चन व अभिनेता असलेला त्यांचा पुत्र अभिषेक यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र बच्चन कुटुंबियांच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे जया बच्चन व त्यांची सून ऐश्वर्या यांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित असल्याचे आढळतात अमिताभ बच्चन यांना तात्काळ काल रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच रुग्णालयात अभिषेक यांनाही ही दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे. त्यांच्या बंगल्यावरील दोघांपैकी एका सुरक्षारक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ रेखा यांचा बंगला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून तो सिल केला आहे.