मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न
schedule01 Jul 20 person by visibility 522 categoryकरमणूक
पंढरपूर:द फायर:प्रतिंनिधी: महाराष्ट्राचे अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाचरणी आषाढी एकादशीच्या पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्री विठ्ठल - रखुमाई मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. महापूजेच्या वेळी विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांच्या पत्नीला मानाचे वारकरी म्हणून विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाली. शासकीय महापूजेच्या वेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते.
यंदा कोरोंनामुळे दर्शनासाठीची रांग नसल्यामुळे मंदिर समितीमधून मानाचे वारकरी निवडण्यात आले आहेत. विणेकरी म्हणून सेवा करणाऱ्या ६ जणांमध्ये चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. विठुरायाकडे साकडं घालत 'आता आम्ही मानवांनी हात टेकले आहेत. त्यामुळं देवा आता चमत्कार दाखव आणि कोरोनाला आजच्या या आषाढीच्या पर्वापासूनच दूर कर असं मागणं घातलं आहे. सर्व संकटं दूर नेण्यासाठी साकडं घातलं', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.