कोरोनाचा कहर ; अनेक नामवंत खेळाडूंना लागण, महिला फुटबालपटूचा मृत्यू
schedule15 Mar 20 person by visibility 292 categoryक्रिडा
नवी दिल्ली: जगभर हाहाकार माजविलेल्या कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन रद्द करण्यात आले आहे तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जगात अनेक नामवंत खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली असून यातील एका महिला फुटबालपटूचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये फुटबॉलपटूंचा समावेश सर्वाधिक आहे. इराणची महिला फुटबालपटू इलहम शेखी हिचा 27 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. इराणची राजधानी तेहरानपासून 150 किमी अंतरावर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यात आतापर्यंत 50 जणांचा जीव गेला आहे.
इंग्लिश प्रीमियर लीगवरसुद्धा कोरोनाचा परिणाम झाल आहे. प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचा विंगर कॅलमला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तो मैदानात आला नाही. त्याच्यावर उपचार सुरु असून आणखी एका सहकारी खेळाडूला कोरोना झाला आहे.