कोरोनावरील लसची दिल्लीत मानवी चाचणी सुरू
schedule25 Jul 20 person by visibility 285 categoryआरोग्य
नवी दिल्लीः कोरोनाव्हायरसचा देशभर थैमान सुरू आहे. दिवसागणिक या आजाराच्या रुग्णात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते आहे.असे असताना दिलासादायक वृत्त आहे.या जगभर हाहाकार करणाऱ्या रोगावरील लसची मानवी चाचणी सुरू झाली आहे.नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या इस्पितळात एका तीस वर्षाच्या तरुणाला ही लस देण्यात आली. या लसची मानवी चाचणी घेण्यासाठी 12 स्वयंसेवकांनी तयारी दर्शविण्यात आली होती. त्यापैकी दहा जणांची लस देण्यासाठी निवड करण्यात आली आहे त्यापैकी पहिल्या स्वयंसेवकाला डोस देण्यात आला आहे.सर्व दहा जणांना कोरोनावरील लस टोचल्यानंतर त्याचा अहवाल इथिक्स समितीला सादर केला जाणार आहे.एम्समध्ये सुमारे 100 लोकांना ही लस दिली जाणार आहे.हैदराबादच्या भारत बायोटेकने कोव्हॅक्ससीन ही लस आयसीएमआर व राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या सहकार्याने तयार केली आहे.भारताच्या औषध विषयक महासंचालकांनी या लसीची मानवी चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. एम्स तसेच 12 संस्थांना कोरोना वरील व्हॅक्सिंनची मानवी चाचणी करण्यास अनुमति देण्यात आली आहे.