कोरोनावरील लस 2021 सालच्या सुरुवातीला उपलब्ध होईलःजागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज
schedule23 Jul 20 person by visibility 261 categoryआरोग्य
न्यूयॉर्कः जगभर दोनशेहून अधिक देशात कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे.या रोगावरील लस येण्यास 2021 सालाचा सुरुवातीचा कालावधी लागेल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे.जगातील अनेक देशात कोरोनाव्हायरस वरील लस शोधण्याचे संशोधन सुरू आहे. त्यात अनेक संशोधकांनी चांगली प्रगती केली आहे काही मोजक्या लस् वरील चाचणी अंतिम टप्प्यात आहे.dontपरंतु या लसीचा रुग्णांवरील वापर होण्यास प्रत्यक्ष 2021 सालचे सुरुवातीच्या काळात होऊ शकेल ,असा अंदाज आरोग्य संघटनेचे तज्ञ माइक रेयोन यांनी व्यक्त केला आहे.
सध्यातरी कोरोनाचा प्रसार रोखण्याचा आमचे प्राधान्य आहे.तसेच लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वत्र तिचे योग्यप्रकारे वितरण होईल याकडे आवर्जून लक्ष दिले जाईल,असे सांगून ते म्हणाले, अनेक लस् चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. सुरक्षितता आणि प्रतिकारशक्ती वाढविणे या निकषावर लस अपयशी ठरलेल्या नाहीत.मात्र रुग्णांना कोरोना वरील लस दिली जात असल्याचे पाहायला मिळण्यास 2021 सालची सुरुवातीचा कालावधी लागू शकेल,असे माइक रेयोन यांनी सांगितले.