डॉ.डी.वाय.पाटील पॉलीटेक्निक तर्फे ऑनलाईन करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे शुक्रवारी आयोजन
schedule29 Jul 20 person by visibility 220 categoryशिक्षण
कसबा बावडा : द फायर: प्रतिनिधी: येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉली तर्फे १० नंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश याबद्दल ऑनलाईन कार्यशाळा शुक्रवार दि.३१ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केली आहे.पालक आणि आणि विद्यार्थी यांनी याचा लाभ घ्यावा.यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, १०चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.हा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वचा टप्पा असतो.या वेळी विद्यार्थी आणि पालक यांना करिअर च्या विविध संधीची माहिती मिळणे आवश्यक असते.ही गोष्ट ध्यानात घेऊन ही ऑनलाईन कार्यशाळा होणार आहे.कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 8087789770 या क्रमांकावर नोंदणी साठी संपर्क करायचा आहे.
या कार्यशाळेत करिअर म्हणजे नेमके काय? योग्य करिअर कसे निवडायचे?१० वी नंतर करिअर च्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी आवश्यकत शैक्षणीक अर्हता काय आहे? प्रवेश प्रकियेत कोणते टप्पे आहेत?शासनाकडून कोणत्या प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळतात? प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याबद्दल माहीती दिली जाणार आहे. प्राचार्य डॉ.महादेव नरके , प्रा. बी .जी.शिंदे, प्रा.नितीन माळी हे याबद्दल माहिती देणार आहेत.