Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

एनडीआरएफची आणखी दोन पथके गुरुवारी कोल्हापुरात दाखल होणार: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

schedule05 Aug 20 person by visibility 737 categoryराजकारण

जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी:

महाराष्ट्रामध्ये दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थिती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या आपत्ती विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा केली व आवश्यक तेथे सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले, या चर्चेदरम्यान सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांना कोल्हापूर जिल्ह्यामधील संभाव्य पुरपरिस्थिती बद्दल विस्तृत माहिती दिली, आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी जादा एनडीआरएफ ची पथके पाठवली जावीत यासाठी आग्रह केला,

 धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी, वारणा, व कोयना धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे, या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवला तर या धरणाखाली येणाऱ्या सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे, सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगे सह जवळपास सर्व नद्या खालील बंधारे पाण्याखाली गेले असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडत आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थितीचा धोका संभवतो असे बैठकीदरम्यान राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले, आणि खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात करिता आणखी जादा एन डी आर एफ ची पथके  मिळावीत अशी मागणी केली,

बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन पथके तातडीने कोल्हापूर कडे रवाना करण्याचे आदेशआपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय येवलकर यांना दिले, यावर संचालक येवलकर यांनी एन डी आर एफ च्या पुणे येथील प्रमुखांना एनडीआरएफ ची दोन पथके कोल्हापूरला रवाना करण्याबाबतच्या सूचना दिल्या, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देखील पूर परिस्थिती बाबत शासनाला अवगत केले होते, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन संचालक येवलकर यांनी वरील आदेश दिले, गुरुवारपर्यंत एनडीआरएफ ची दोन पथके कोल्हापुरात दाखल होतील असेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes