Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

ट्वॉईस ट्वेल्ट फेल… फर्स्ट इन पी. एस. आय.

schedule18 Mar 20 person by visibility 415 categoryउद्योगमहिला

कोल्हापूर : द फायर - प्रतिनिधी

बारावीत परीक्षेत नापास होऊनही पुढे जिद्दीने अभ्यास करत आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास 'ट्वेल्थ फेल' या पुस्तकामुळे प्रसिद्ध झाला आहे. काहीशी अशीच गोष्ट यंदा पीएसआय परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या वैभव नवले या तरुणाची आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील वैभवने बारावी परीक्षेत दोनवेळा नापास झाल्यानंतरही जिद्दीने कला शाखेतील पदवी घेतली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या संयुक्त दुय्यम सेवा परीक्षा २०१८ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी झालेल्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील वैभव अशोक नवले हा राज्यातून प्रथम आला आहे.

इयत्ता बारावीत दोन वेळा नापास झाल्यावरही, बीएचे शिक्षण पूर्ण करीत वैभवने हे यश संपादन केले आहे. याच परीक्षेत नगरमधील ज्ञानदेव रघुनाथ काळे हा मागासप्रवर्गातून प्रथम आला आहे, तर महिला प्रवर्गातून सातारा जिल्ह्यातील दिपाली सूर्यकांत कोळेकर पहिली आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ (ता. करवीर) येथील अश्विनी रामदास डवरी-जाधवने अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात मुलींत प्रथम क्रमांक पटकावला. सातारा येथील दिपाली कोळेकर हिने महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. इचलकरंजी येथील करिश्मा शेख हिने ओबीसी प्रवर्गातून महिलांमध्ये सहावा क्रमांक मिळविला.

वैभव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रहिवासी असून, त्याने बीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. वैभवचे वडील एसटी महामंडळाचे निवृत्त कर्मचारी आहेत. वैभव बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेत दोनदा अनुत्तीर्ण झाला आहे. मात्र, त्यानंतर त्याला शिक्षणाचे महत्त्व समजल्याने बीएचे शिक्षण उरण येथे केले. प्रामाणिकपणे अभ्यास व प्रयत्न करून हे यश संपादन केल्याचे वैभवने सांगितले.

एमपीएससी'मार्फत पोलिस उपनिरीक्षक गट ब संवर्गातील एकूण ३८७ पदांसाठी २६ ऑगस्ट २०१८ रोजी पेपर क्रमांक १ आणि २ सप्टेंबर २०१८ रोजी पेपर क्रमांक २ घेण्यात आला. या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला गेला.

कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ (ता. करवीर) येथील अश्विनी रामदास डवरी-जाधवने अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात मुलींत प्रथम क्रमांक पटकावला. सातारा येथील दिपाली कोळेकर हिने महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. इचलकरंजी येथील करिश्मा शेख हिने ओबीसी प्रवर्गातून महिलांमध्ये सहावा क्रमांक मिळविला.  या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ३०हून अधिक उमेदवारांनी यश मिळविले आहे. त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे.

इचलकरंजी येथील करिश्मा बाळासाहेब शेख यांनी ओबीसी प्रवर्गातून सहावा क्रमांक मिळविला आहे. करिश्मा यांचे वडील विणकाम व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जयभवानी विद्यालय तर पदवीचे शिक्षण दत्ताजीराव कदम कॉलेजमध्ये झाले. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. कसल्याही परिस्थितीत यश मिळवायचे ही जिद्द ठेऊन अभ्यास केला.

कौलगे (ता. कागल) येथील शितल हणमंत माने यांनी या परिक्षेत १७वा क्रमांक मिळविला. त्यांचे वडील शेती करतात, तर आई गृहिणी आहे. त्यांचे शिवराज विद्यालयात हायस्कूलपर्यंतचे शिक्षण झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण कमला कॉलेजमध्ये घेतले. देवचंद कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. रुचिरा भाले (कागल, रँक १०), महादेव कांबळे (बाजार भोगाव-पन्हाळा, रँक १२), मंगेश कांबळे (रँक २१), शीतल अनुसे (हातकणंगले, रँक १४), पूजा पाटील (कोतोली-पन्हाळा, रँक १६), मंदार शिंदे (कोल्हापूर, रँक १६), बाबू कस्तुरे (शाहूवाडी, रँक १७), वैभव गायकवाड (कोल्हापू, रँक १९), दिपक सोनुने (रँक २२), केदार चव्हाण (रँक ३०), सूरज आमते (रँक ६३), दिपक बाबर (रँक ७२) यांच्यासह उत्तम कांबळे, अक्षय पाटील, अक्षय ताटे, नितीन बाबर, रोहित पाटील, सपना आडसूळ यांनी पीएसआय परीक्षेत यश मिळविले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes