प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे वृद्धापकाळाने निधन
schedule04 Jun 20 person by visibility 322 categoryकरमणूक
मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले ते नव्वद वर्षांचे होते. छोटी सी बात, रजनीगंधा, बातो बातो में, एक रुका हुआ फैसला, चमेली की शादी हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट गाजले होते. 50 हून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. रजनी व व्यामकेश बक्षी या त्यांच्या मालिकाही गाजल्या होत्या. मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रेम कथा याविषयी त्यांचा हातखंडा होता.