मैत्री युवा दिनानिमित्त युवासेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने ३००० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
schedule02 Aug 20 person by visibility 260 categoryराजकारण
कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात “मैत्री दिन” म्हणून साजरा करणेत येतो, भारतातही युवा वर्गाकडून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून, अखंड मित्रत्वाचे ऋणानुबंध अधिक घट्ट करते. या मैत्री दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना कोल्हापूर शहर आणि नो मर्सी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने “मैत्री युवा महोत्सव” चे आयोजन करण्यात येते. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून सुरु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा “मैत्री युवा महोत्सव” रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी सामाजिक दृष्टीकोनातून शहरातील तीन हजार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. “शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या. युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने दरवर्षी मैत्री युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या मैत्री युवा महोत्सावाच्या माध्यामातून युवा वर्गाने निर्व्यसनी होण्याचा संकल्प करून, निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प उपस्थित युवा वर्गाच्या वतीने करण्यात येतो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे यावर्षीचा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून, शहरातील ३००० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. नो मर्सी ग्रुपच्या वतीने वर्षभर गरजूंना मदत, रक्तदान शिबीर, अंधशाळा, वृद्धाश्रम, बालसंकुलास स्नेहभोजन, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याच सामाजिक भावनेतून मैत्री युवा महोत्सवाचा खर्च टाळून त्या रक्कमेतून शहरातील ३००० शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून पालकांना दिलासा देण्याचा कौतुकास्पद उपक्रम युवासेना, नो मर्सी ग्रुपच्या वतीने करण्यात आला, याबद्दल त्यांचे अभिनंदन. पुढील काळातही असेच सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर प्राथमिक स्वरूपात ३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. पुढील १५ दिवसात शहरातील प्रत्त्येक भागात या साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या शालेय साहित्यामध्ये दप्तर, वह्या, कंपास आदी साहित्य समाविष्ठ आहे. यावेळी शिवसैनिक प्रमोद कोळी यांनी ३०० डझन वह्या देवून या उपक्रमास सहकार्य केले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, ज्ञानदीप क्लासचे संचालक नारायण निळपणकर, नो मर्सी ग्रुपचे अक्षय पाटील, अजिंक्य पाटील, रोहन घोरपडे, हर्षवर्धन पाटील, युवासेनेचे सौरभ कुलकर्णी, कृपालसिंह रजपूत, विजय रेळेकर आदी उपस्थित होते.