सोने दराचा नवा विक्रम,दहा ग्रॅम 54,798 रुपये दर
schedule05 Aug 20 person by visibility 690 categoryउद्योग
नवी दिल्लीः सोने दराचा नवा विक्रम नोंदला गेला आहे. कोरोनाव्हायरसच्या फटक्यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे त्यामुळे ती सावरण्यासाठी अनेक देश आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.त्यामुळेच सोने-चांदी दरात विक्रम वाढ होऊ लागली आहे.काल मंगळवारी जागतिक बाजारात सोने दर 2000 डॉलर प्रति औस झाला तर भारतीय बाजारपेठेत आज आज बुधवारी सोने-चांदी विक्रमी दरावर पोहोचली .प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर 54 हजार 798 रुपये झाला असून चांदी प्रति किलो 69 हजार 891 रुपये झाली आहे.सोने दरात 10 ग्रॅमला 900 रुपये व चांदी प्रति किलो 4200 रुपये एवढी विक्रमी वाढ काल झाली. दोन्ही धातूतील तेजीचा कल आजही ही कायम आहे आणि आगामी काळातही कायम राहील ,अशी शक्यता सराफ बाजारातून व्यक्त करण्यात येते.