आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत वर्क फ्रॉम होमला अनुमति
schedule22 Jul 20 person by visibility 286 categoryउद्योग
नवी दिल्ली:कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अध्याप आटोक्यात आलेला नाही.त्यामुळे दूरसंचार विभागाने आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आयटी कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीला परवानगी देता येईल. या आधी आयटी व बीपीओ क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 31 जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम पद्धतीने घरूनच काम करता येत होते. पण कोरोनाव्हायरसचा संसर्ग अधिकच वाढत चालला असल्याने केंद्र सरकारने वर्क फ्रॉम होमची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवून या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.