Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

सरकारनं लाँच केलं कोविड-१९ ट्रॅकिंग आरोग्य सेतू अ‍ॅप

schedule03 Apr 20 person by visibility 349 categoryनवनिर्मिती

नवी दिल्ली: देशभरात थैमान घातलेल्या करोनाला रोखण्यासाठी सरकारने अनेक मोठी पावलं उचलली आहेत. त्यानंतर आता सरकारनं आरोग्य सेतू अ‍ॅप लाँच केलं आहे. हे एकप्रकारचे कॉम्प्रिहेन्सीव्ह कोविड-१९ ट्रॅकिंग अ‍ॅप आहे. करोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणं हा अ‍ॅपचा प्रमुख उद्देश आहे. सध्या हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप आपल्याला गूगल प्ले आणि अ‍ॅपल स्टोअर मधून डाऊनलोड करता येणार आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतं. जीपीआरद्वारे व्यक्तीचं रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करण्यात येतं. तसंच कोणताही करोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे अ‍ॅप ट्रॅक करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप व्यक्तीला ट्रॅक करू शकतं. करोना कवच या अ‍ॅपप्रमाणेच यात फोन क्रमांकाद्वारे रजिस्टर करावं लागणार आहे. त्यानंतर हे अ‍ॅप एक ओटीपी पाठवेल. त्यानंतर तुमचं नाव, वय अशा प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. जोपर्यंत मोबाईलचं लोकेशन ट्रॅकिंग सुरू आहे तोवर हे अ‍ॅप ट्रॅक करत राहणार आहे. तसंच तुम्हाला फोनचं ब्ल्यूटूथही सुरू ठेवावं लागणार आहे.

यात कोविड-१९ बाबतीतील माहिती आणि संरक्षणाचे उपायही सांगण्यात आले आहेत. तसंच नजीकच्या कोविड-१९ हेल्पसेंटरबाबतही माहिती देण्यात आली आहे. हे अॅप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes